भाजपाला मोठा धक्का ; हर्षवर्धन पाटील करणार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे हाती तुतारी घेण्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा होत्या, येत्या दोन ते तीन दिवसात हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा पक्षप्रवेश पुण्यात होण्याची शक्यता आहे.

 

हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याने, इंदापूर शहरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे.

भाजपमध्ये राहिल्यास हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मध्ये निवडणूक लढू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करून इंदापूर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.