मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कोकण-ठाणे विभागातील भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा नवी मुंबई येथे पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि खासदारांना अमित शाह यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवू, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन सरचिटणीस शिवप्रकाश, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी, खा. नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, आ. आशिष शेलार, माजी खासदार रावसाहेब दानवेजी उपस्थित होते.
