अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

मुंबई: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. अक्षयच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू झाली आहे. हायकोर्टाने या सुनावणीत सरकारी वकीलांना गंभीर सवाल केलेत. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का ?चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजन थोडं कठीण जातंय ,असं हायकोर्टाने म्हटलं. रिव्हॉलवर चालवणं ही सामान्य माणसासाठी शक्य आहे का ?असाही सवाल कोर्टाने केला आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचे एन्काऊंटर वर काही सवाल उपस्थितीत केले आहेत. परंतु कोर्टाने हे स्पष्ट केले आहे की, आमचा पोलिसांच्या कारवाईवर सवाल नाही. परंतु जे सत्य आहे ते समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी अक्षय शिंदे वर जी गोळी झाडली ते हत्यारांचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा. असे हायकोर्टाने म्हटले आहे.

अक्षय शिंदे चा मृत्यू हा गोळी लागून झाला आहे, हे पोस्टमार्टम मधून स्पष्ट झाले आहे. परंतु ती गोळी चालवण्या मागचा हेतू काय होत आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. असं हायकोर्टाने स्पष्ट केल आहे.