मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून, या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीच्या नेत्याकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत लिहून घ्यावे असे आवाहन केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना मी आवाहन केल आहे की, जर तुम्हाला महाविकास आघाडीतील तीन पक्षांनाच मदत करायची असेल तर त्यांच्याकडून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ असे लिहून घ्या.