नागपूर: अमित शहा यांनी 45 जागा जिंकण्याबाबत वक्तव्य केलं होतं यावर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. विदर्भ भाजपच्या हातून गेला आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेस आणि महाविकास आघाडी 45 जागा जिंकेल. असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
मोदी आणि शहा जितक्या वेळा महाराष्ट्रात, विदर्भात येतील तितकं भाजपचे नुकसान होणार आहे. जिथे जिथे मोदी गेलेत तिथे भाजपचे नुकसान झाले आहे. मोदी चंद्रपूर, भंडारा, गोंदियात गेलेत, तिकडे पराभव झाला . ते नागपूरला आले असते तर गडकरी हरले असते. महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला निवडून आणण्याचे ठरवलं आहे. अमित शहा जेव्हा येतात तेव्हा गडकरी गायब असतात असे हि विजय वडेट्टीवार म्हणाले.
भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी ,देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे करणार असतील तर चांगल आहे. भाजपची धुरा नागपूरच्या लोकाकडे असली की आम्ही बिनधास्त राहू. कारण या लोकांना जनतेने नाकारतर आहे. असे हि ते यावेळी म्हणाले