खोची गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; मनीष गुरव ,प्रतिक गुरव यांची मुंबई हायकोर्टात निवड

कुंभोज  ( विनोद शिंगे)

खोची गावचे सुपुत्र मनीष पोपट गुरव व प्रतीक प्रदीप गुरव यांची मुंबई हायकोर्ट येथे शिपाई पदी निवड झाल्याबद्दल समस्त खोची येथील गुरव समाज व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, ग्रामपंचायतचे उपसरपंच सुहास गुरव ,वारणा कारखान्याचे माजी संचालक वसंतराव गुरव, प्रा बी के चव्हाण, माजी उपसरपंच एम के चव्हाण, माझी पंचायत समिती सभापती अजय पाटील, विजय पाटील, अभिजीत चव्हाण, तसेच ग्रामपंचायत तिचे सर्व पदाधिकारी विविध सेवा संस्थांचे चेअरमन संचालक तसेच समस्त गुरव समाजातील पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

मनीष गुरव, प्रतिक गुरव यांच्या निवडीने खोची गावच्या शिरपेच्यात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचे मत यावेळी युवा नेते व भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी बोलताना व्यक्त केले, यावेळी वटवृक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.  त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्या मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी परिसरात फटाकेची आतेषबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद साजरा केला.

 

🤙 9921334545