दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला. केजरीवाल यांच्या खुर्चीच्या बाजूला, दुसऱ्या खुर्चीवर बसून त्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले.
आतिशी म्हणाल्या की,”आज माझी मनस्थिती रामायणातील भरता सारखी आहे. प्रभू राम यांचा वनवास सुरू असताना भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून 14 वर्षे राज्य केलं. त्याचप्रमाणे पुढील चार महिने मी दिल्लीचे सरकार चालवणार आहे. केजरीवाल यांनी सन्मान आणि नैतिकतेचा आदर्श घालून दिला आहे.”