कोल्हापुरात एकाचा चाकूने भोसकून खून !

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हातगाडी लावण्यावरून तरुणाचा खून  करण्यात आला. या हल्ल्या मध्ये तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.  कोल्हापूरच्या आराम कॉर्नर जवळ ही घटना घडली असून ,इम्रान इमाम मुजावर (वय 32, रा.आराम कॉर्नर,शिवाजी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

एकीकडे गणेश विसर्जन मिरवणूक आणि दुसरीकडे खून झाल्याने कोल्हापूर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान संशयित आरोपी युसूफ अलमसजीत याला राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

🤙 9921334545