अरविंद केजरीवालांची जेलमधून सुटका ;आप कडून साखर वाटून जल्लोष

कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कथित मद्य घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करून सीबीआय ने अटक केली होती. गेले पाच महिने ते तिहार जेलमध्ये होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक झाल्याने देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत होत्या.

 

 

लोकसभा निवडणुकीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना अंतरीम जामीन मंजूर करून त्यांना दिलासा दिला होता. परंतु निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले होते.

कथित मद्य घोटाळ्यात त्यांना ईडी कडून जामीन मिळाला होता, दरम्यान त्यांना सीबीआय ने अटक केली होती. या प्रकरणात अटक केलेल्या चाळीस पैकी अडतीस आरोपीना जामीन दिला गेला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना देखील जामीन दिला गेला. तसेच सीबीआयच्या कार्यप्रणालीवर कठोर निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायलयाने त्यांनी पिंजऱ्यात असलेला पोपट असल्यासारखे वागू नये असे सुनावले.

🤙 9921334545