कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभा मतदारसंघात पाठिंबा दिल्याने माजी आमदार संजय घाटगे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकृत संचालक पदी संधी मिळणार आहे . संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल.
संचालक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले उमेदवारांचे तोंडचे पाणी पळालं आहे . कोल्हापूर जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक पदाच्या दोन जागा रिक्त होत्या. त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून घाटगे यांची निवड निश्चित आहे.