कोल्हापूरामध्ये तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी ;

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील

पर्यावरणपूरक सण साजरा करणं हि आजच्या काळाची गरज बनली आहे. कोल्हापूर मध्ये सुद्धा पर्यावरणपूरक गणेशोस्तव साजरा करण्यावर भर दिला जातोय.

 

आज गणपती विसर्जनासाठी कोल्हापुरातील महापालिका प्रशासनाने कोटीतीर्थ तलाव आणि इराणी खाण मूर्तीचे विसर्जन करण्यास बंद करण्यात आलं आहे. मूर्तीचे दान करण्यास प्रशासन नागरिकांना आवाहन करत आहेत.कोटीतीर्थ तलावा ऐवजी शाहू मिल चौकात प्रशासनामार्फत जलकुंड ठेवले आहेत.