संजय राऊत यांनी केला अजित पवारांवर हल्लाबोल ;

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते यांनी जोडे मारा आंदोलन केलं. या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “हिम्मत असेल तर समोर या, रडीचा डाव कशाला” अशा शब्द टीका केली होती .

या आंदोलनावरील टीकेबद्दल संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःच कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकतीचा वापर करून पळवून नेतात. त्यांच्या तोंडात अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.