_अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवरायांचा पुतळा कोसळला नसून अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला – शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले

 

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व हातकणंगले विधानसभेचे मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मालवण मधील किल्ले श्रीराजकोट येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात हातकणंगले मध्ये जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

 

निषेध आंदोलनाची सुरुवात हातकणंगले पंचायत समिती समोर असणाऱ्या पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाला तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आंदोलनास सुरुवात केली. यावेळी बोलताना व घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविताना उपस्थित सर्व शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. यावेळी मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर यांनी सदरील घटना अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, तरी या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वच आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी* असे मत व्यक्त केले. तसेच जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी बोलताना, मालवण येथील किल्ले श्रीराजकोट येथे कामाचा अनुभव नसलेल्या लोकांना महाराजांचा पुतळा उभा करण्याचे काम केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिले. यामुळे अतिशय घाई गडबडीमध्ये उभा केलेले अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ आठच महिन्यामध्ये कोसळला. महाराजांचा पुतळा कोसळणे म्हणजे अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळणे असेच आहे, त्यामुळे सदरील घटनेस जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा तसेच राज्यकर्त्यांचा तीव्र शब्दात कोल्हापूर शिवसेना यांच्या वतीने निषेध व्यक्त केला.

_यावेळी मा. जि. प. सभापती प्रवीण यादव, उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, उपतालुकाप्रमुख राजूदादा पाटील, हातकणंगले शहरप्रमुख धोंडीराम कोरवी, मा. पं. स. सदस्य पिंटू मुरूमकर, संभाजी हांडे, अमोल देशपांडे, संजय लोहार, अविनाश शिंदे, उदय शिंदे,संदीप दबडे, अंकुश माने, सुनील माने, विनायक शेंडगे, अर्जुन यादव, सयाजी कांबळे, नितीन पवार, भानूदास पाटील, दीपक कोळी, शरद पवार, काका पाटील, विनायक कोठावळे, स्वप्नील सरोदे, अविनाश शिंदे, अमर पाटील, श्रीकांत निकम, रजनीकांत माने, सुधीर कांबळे, प्रवीण माने, गणेश पाटील, बंटी चोकाककर, विशाल साजणीकर, अमर आठवले, प्रियदर्शन पाटील, रमेश कांबळे, रवींद्र कांबळे, विष्णू पाटील, प्रशांत नरंदेकर, जालिंदर जाधव, सुनील वड्ड, अनिकेत पांडव, संतोष सूर्यवंशी, अक्षय लोंढे, विशाल तेली, संस्कार पाटील, अर्जुन जाधव, सचिन चौगुले, सचिन थोरवत, अंकुश सूर्यवंशी, अभिजीत रानोजी, संतोष भोसले, अरुण घाडगे, मनोज शिंदे, सुभाष माने, राजू दरवेशी, पियुष शिरोलीकर, संतोष शिंगाडे, सिद्धार्थ माने व इतर पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक तसेच इतर अंगीकृत व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते._

🤙 9921334545