कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे
आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या कोरोची येथील ग्रामा २२२ वडिंणगे कारखाना ते शिवाजी नगर रोड येथे खडीकरण, मुरमीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपसरपंच पूजा टिळे, ग्रा. पं. सदस्य शीतल पाटील, ग्रा. पं. सदस्य आनंदा लोहार, ग्रा. पं. सदस्य विकी माने, ग्रा. पं. सदस्य संजय शहापुरे, विनायक बचाटे, राजू सुतार, मनोज खारखंडे, सचिन रुपनर, मधुकर कोळेकर, प्रविण कोरेकर, नागनाथ टिळे, नितीन संकपाळ, जाधव, अशोक मोटे, भोसले, संकपाळ यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.