‘केशवराव भोसले नाट्यगृह जसेच्या तसे उभारले जाईल’ : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ नाट्यगृहाची इमारत जशीच्या तशी वर्षभरात उभारली जाईल, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या,समितीस शासन मान्यता देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.

हसन मुश्रीफ म्हणाले की, नाट्यगृह जसेच्या तसे उभे करण्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी 25 कोटी रुपयांचे इस्टिमेट काढले आहे .तसेच नाट्यगृहासाठी वेळेवर निधी देण्याची जबाबदारी माझी आहे.

🤙 9921334545