हातकणंगले राखीव मतदार संघातून अशोकराव माने यांचा विजयश्री खेचून आणण्याचा उद्योजकांचा घाट

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे

आगामी होणाऱ्या हातकणंगले विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य भाजपच्या माध्यमातून विजयश्री खेचून आणण्याचा संकल्प दलित मित्र अशोकरावज माने यांनी केला असून, त्यासाठी त्यांना आता हातकणंगले तालुक्यातील उद्योजकांची ही साथ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांना हातकणंगले तालुक्यातून मोठ्या प्रतिसाद मिळत असुन. परिणामी त्यांनी गेल्या चार वर्षात जनतेशी असलेला संपर्क वेगवेगळ्या माध्यमातून अनेक गावांमध्ये लावलेला मोठ्या प्रमाणात फंड, व त्यांच्या मागे असणारी जनस्वराज पक्षाचे नेते विनय कोरे व भाजपच्या नेत्यांची असणारी ताकद यामुळे आगामी हातकणंगले विधानसभा निवडणुकीत ते विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी होतील असा विश्वास सध्या जनसुराज्य व भाजप गटाच्या कार्यकर्त्यांच्यातून बोलला जात आहे.

 

 

मागील विधानसभा निवडणुकीत काही हजार मताच्या फरकाने झालेला पराभव अशोकराव माने यांच्या जिवारी लागला असून, त्या पराभवनी त्यांनी खचून न जाता, मागील पाच वर्षात त्यांनी सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ ,नेत्यांचा जिंकलेला विश्वास व कार्यकर्त्यांची असणारी मोठी फौज, युवकांचा असणारा त्यांच्यावरील विश्वास व देशाच्या राजकारणात भाजपने केलेली विकास कामे, लाडकी बहीण योजनेचा परिणाम या सर्व गोष्टीमुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मागे हटायचं नाही असा निर्धार ही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे हातकणंगले मतदारसंघ पिंजून काढण्यास माने यांनी सुरुवात केली असून प्रत्येक गावापर्यंत ते जवळजवळ पाच ते दहा वेळा वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचले आहेत. जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर व शिंदे फडवणीस सरकारच्या माध्यमातून व आमदार विनय कोरे यांच्या सहकार्याने त्यांनी हातकणंगले मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामाची जाळे उभा केल आहे. त्यांची लढाई सध्याच्या घटकाला महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार राजू बाबा आवळे यांच्याशी होण्याची संकेत व्यक्त केले जात असून, आमदार राजू बाबा आवळे यांनी केल्या पाच वर्षात मतदार संघात खेचून आणलेली कोट्यावधीची विकास कामे व चालू असलेली विकास कामांच्या जोरावर ही निवडणूक महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी चर्चा सर्वसामान्य राजकीय वर्तुळात होत आहे. परिणामी माजी आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेले डॉक्टर सुजित मिंणचेकर यांचाही हातकणंगले तालुक्यात गेल्या पंधरा वर्षापासून असणारा संपर्क त्यांनी केलेले कार्य, जर त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास नक्कीच फळाला येईल, असे मत उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांच्यातून बोलले जात आहे. परिणामी हातकणंगले विधानसभेची उमेदवारी महाविकास आघाडीतुन नेमकी कोणाला मिळणार ,उमेदवार कोण असणार व उमेदवारी न मिळाल्यास कोण बंडखोरी करणार याची चर्चा मात्र सध्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात रंगत आहे.

परिणामी सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलेल्या लाडकी बहिण योजना तसेच मुलींना मोफत शिक्षण या योजनेचा तसेच शेतकऱ्याची वीज बिल माफ, कर्जमाफी याचा नक्कीच लाभ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदे सरकारला व त्यांनी दिलेल्या उमेदवाराला होणार असल्याचे मत ही व्यक्त होत आहे.
पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मध्यंतरीच्या काळात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पाठबळावर राजीव आवळे यांनी प्रतिनिधित्व केले. यानंतर डॉ. सुजित मिणचेकर यांनी शिवसेनेच्या वतीने दोन टर्म प्रतिनिधित्व केले. सध्या या मतदार संघाचे काँग्रेसचे आम. राजूबाबा आवळे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. लोकसभेला अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झालेले शिंदे फडवणीस गटाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचीही माने यांना साथ मिळणार असल्याचे बोलले जात आहे

दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी 39 वर्षांपूर्वी एका फोंड्या माळरानावर छत्रपती शाहू को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेची स्थापना केली. उद्योग निर्मितीसाठी चालना देऊन परिसरात नंदनवन फुलवले. याकरिता त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. आता हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी या संस्थेतील सर्व उद्योजक जीवाचे रान करतील असा विश्वास अनेक उद्योजकांकडून व्यक्त करण्यात आला.

🤙 9921334545