कोल्हापूर : अल्पवयीन मुलीशी छेडछाड करून शिवीगाळ करणाऱ्या गौरव अनिल पाटोळे (वय 24, रा. गणेश गल्ली लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर) यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीच्या आईने संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली. मार्च 2024 ते 27 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला.
गौरव पाटोळे या तरुणांने पीडित मुलीला माझे तुझ्याकडे काम आहे. असे सांगून घरी बोलावले होते. तिच्या इच्छे विरुद्ध तिला स्पर्श करून, लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन केले. तसेच मोबाईल मध्ये त्या मुलीचे छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करतो. असे बोलून त्यांनी शिविगाळ केली. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताना संशयिताने पीडितेला भिंतीवर ढकलून दिले. यावेळी मुलीच्या डोक्याला व हाताला इजा होऊन ती जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित मुलीच्या छेडछाडीच्या घटनेची फिर्याद दाखल होताच निरीक्षक दिलीप पवार यांनी तरुणाला अटक केली.