अज्ञात वाहनाच्या धडकेत कॉलेज तरुणी ठार

 

कोल्हापूर:   अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कॉलेज तरुणी ठार झाली. गोकुळ शिरगाव रोडवर हा अपघात झाला. शिवानी संतोष पाटील (वय 19, अंबाई टॅक नवनाथ हाऊसिंग सोसायटी कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला.

 

 

केआयटी येथे शैक्षणिक प्रवेशाच्या चौकशीसाठी शिवानी सकाळी मोपेड वरून गेली होती. कॉलेज मधील काम संपल्यानंतर ती घरी जात असताना गोकुळ शिरगाव जवळील सुदर्शन पेट्रोल पंपा जवळ आली असता, तिला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात शुभांगी मोपेडसह 25 फूट फरफडत गेली. नागरिकांनी तिला उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तिच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे.

 

🤙 9921334545