कोल्हापूर जिल्ह्यात 800 बालके ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ या आजाराने ग्रस्त !

 

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यात  ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ या आजाराने 45 हजार बालके ग्रस्त आहेत. वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवितास धोका वाढत आहे. या आजारावरील औषधोपचार महाग असून, तो सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये. त्यामुळे अनेक पालक हे हतबल झाले आहेत.

 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे 800 बालकं या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारात शरीरातील सर्व अवयवातील स्नायूंचा विषाणू  ऱ्हास करतात. या आजाराने ग्रस्त बालके कधीही चालू शकत नाहीत. वयाच्या आठव्या वर्षानंतर त्याचं चालणं थांबतं. पुढे पाठीच्या मणक्या.cha  त्रास होऊन मनका लुळा पडतो. त्यामुळे ही बालके बेडवरच पडून राहतात.आणि स्नायू ऱ्हासाने त्यांचा मृत्यू होतो.

या आजाराच्या बालकांना इलेक्ट्रिकल व्हीलचेअर उपलब्ध कराव्यात. तालुकास्तरावर फिजिओथेरपी केंद्र स्थापन करून रुग्णांना उपचार द्यावेत, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बालकांना ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण उपलब्ध करावे .महिलांच्या गर्भधारणेत आवश्यक मस्क्युलर डिस्ट्रॉफी जनुके तपासणी मोफत करून पुढील उपचार द्यावेत. मस्कुलर डिस्ट्रॉफी चे रुग्ण शहरासह ग्रामीण भागात सुद्धा आहेत संशयित रुग्णांची जेनेटिक तपासणी केल्यास रुग्णावर उपचार करणे सोपे होईल त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे.