कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे गगनबावडा ,शाहुवाडी ,पन्हाळा, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे.
कोल्हापूर शहरात पाऊस असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. धरण क्षेत्रातील मुसळधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाची चारस्वयंचलित दरवाजे खुले आहेत. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
पंचगंगेच्या पातळीत वाढ होऊन 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.