कोल्हापूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू :अजित पवार यांची ग्वाही

कोल्हापुर : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर गुरुवारी लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंचगंगेला येणाऱ्या महापुरामुळे शेतीसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी महापुराचे पाणी दुष्काळी तालुक्यामध्ये वळवण्याची योजना आम्ही आखली आहे. यासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली असून, यामुळे महापूराचे संकट येणार नाही .

 

या जिल्ह्याचे राज्यावर मोठे उपकार असून ते कधीही फेडता येणार नाहीत. आम्हीही ते विसरलेलो नसून अंबाबाई ज्योतिबा मंदिर विकास आराखडा यासह विविध प्रकल्पासाठी कोटीवधी रुपये मंजूर केले आहेत. यापुढच्या काळातही कोल्हापूरसाठी निधी देऊ अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

🤙 9921334545