कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील
अंध युवक मंच ही अंधासाठी ,अंधानी चालवलेली सामाजिक संस्था आहे. या संस्थेद्वारे बदलापूर येथील पीडित मुलींच्या वर झालेल्या अन्यायाविरोधात समस्त दिव्यांक यांच्या वतीने निषेध करण्यात आला. शाळेचे व्यवस्थापक ,संबंधीत स्टाफ यांच्यावर शासनाच्या वतीने योग्य कारवाई करण्यात यावी, तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर लवकरात लवकर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा वारंवार घटना होऊ नये म्हणून सरकारने कडक पावले उचलावी. यासाठी अंध युवक मंच संस्थेद्वारे शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी ऑफिस पर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

समाजातील विकृत व्यक्तींवर झडप बसेल येथून पुढे अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये, याची सरकारने दखल घेण्यात यावी. त्याकरिता सरकारने शिवकालीन शिक्षेचा अंमल करावा म्हणजे त्या पीडीत मुलींना न्याय मिळेल असे या मोर्चा वेळी सांगण्यात आले.
