भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लांबणीवर!

दिल्ली = भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाल संपल्याने, अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

      मात्र भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्राकडून मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे, तसेच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया नव्याने सुरू होणार आहे. जानेवारी 2025 मध्ये भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील.

🤙 9921334545