करवीर पोलिस ठाणे अंतर्गत येणार्‍या 11 बिटमधे शांतता समन्वय बैठक संपन्न.

कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील 
करवीर पोलीस ठाणे हद्दीतील वडणगे- प्रयाग चिखली, बीट कार्यक्षेत्र अंतर्गत येणारे 11 गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,शांतता कमिटी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, साऊंड सिस्टिम चालक-मालक यांची गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, ईद-ए-मिलाद विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून शांतता समन्वय बैठक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घेतली.

 

सर्व विभागांची रीतसर परवानगी घ्यावी,सदरचे सण पारंपरिक वाद्यामध्ये साजरे करावे., ध्वनी प्रदूषण अनुषंगाने . सर्वोच्च न्यायालय यांचे निर्देशानुसार दिलेल्या अटी शर्तींचे पालन करावे, मूर्ती प्रतिष्ठापना ठिकाणी 24 तास स्वयंसेवक हजर ठेवावे, प्रत्येक मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापना व गर्दीचे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे,मंडळांनी सामाजिक, शैक्षणिक, विधायक, समाजपयोगी कार्यक्रम राबवावे, सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये, अशी पोस्ट आल्यास तात्काळ डिलिट करावी. मिरवणूक ठरवून दिलेल्या मार्गावरून वेळेत काढून वेळेत समाप्त करावी. मिरवणूक मागे पुढे घेण्याच्या कारणावरून वाद विवाद करू नये. रहदारीस अडथळा होणार नाही. याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित पोलीस ठाणे व डायल 112 वर संपर्क करावा. मूर्ती प्रतिष्ठापना ते विसर्जन यादरम्यान काय करावे , काय करू नये याबाबत सविस्तर चर्चा करून, मुद्देनिहाय माहिती देऊन योग्य खबरदारी घेणे बाबत मार्गदर्शन केले.
सदर उत्सव कालावधीत जमा झालेली वर्गणी, लहान मुलांच्या स्पर्धा, यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना मदत, आपल्या घरातील मुलींना, स्त्रियांना कार्यक्रमात पुढाकार देऊन मोठ्या उत्साहात शांततेत पार पाडावे. असे आवाहन केले.खुन्नस, स्टेटस स्पर्धा,हुल्लडबाजी अथवा नियमबाह्य, गैर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
गोपनीय अंमलदार अविनाश पोवार यांनी प्रास्ताविक करून वेगवेगळ्या गावातील यापूर्वी घडलेल्या घटनांची माहिती देऊन अशा घटना पुन्हा होऊ नयेत.. कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत माहिती दिली.
सदर वेळी वडणगे गावातील सरपंच संगीता पाटील, पाडळी बुद्रुक माजी उपसरपंच गावचे धनाजी पाटील, केर्ली गावचे दीपक पाटील यांनी मनोगते व्यक्त करून सदरचे सण , उत्सव, कार्यक्रम, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून शांततेत पाडत असल्याचे सांगून उपस्थित तरुणांना आवाहन केले.
यावेळी वडणगे गावचे सरपंच युवराज शिंदे, भुयेवाडी सरपंच देवकुळे, रजपूत वाडी सरपंच प्रवीण कांबळे इतर गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शांतता कमिटी, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मंडळाचे अध्यक्ष,कार्यकर्ते 190-200 बीट अंमलदार, विकास जाधव, संजय काशीद, बळीराम पोथरे उपस्थित होते.

🤙 8080365706