कोल्हापूर : सैन्य दलातील जवान अमर भीमगोंडा देसाई यांना त्यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने विषारी द्रव्य पाजले होते,यामध्ये त्यांचा पाच ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. यानंतर प्रियकर सचिन राऊत यांनीही विषारी द्रव्य पिऊन आपले जीवन संपवले अशी माहिती गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक गजानन सरकर यांनी दिली.
तेजस्विनी देसाई व सचिन राऊत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.आता राऊत याचा मृत्यू झाल्याने तेजस्विनी वर या प्रकरणी पुढील कारवाही सुरू राहणार आहे. तेजस्विनी ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.