“कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर व इंटर्नही सहभागी”?

मुंबई : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर बलात्कार झाला या घटनेचा तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या घटनेचा तपास करत आहे) सांगितलं की, रुग्णालयातील काही इंटर्न व डॉक्टर या गुन्ह्यात सहभागी असू शकतात.

पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. यासह मृत तरुणीच्या आई-वडिलांचा ज्या-ज्या लोकांवर संशय़ आहे त्यांच्या नावांची यादी त्यांनी सीबीआयला दिली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंततर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

🤙 9921334545