गडचिरोली :जीवाची बाजी लावून नक्षलांशी दोन हात करत असताना शौर्य गाजवणाऱ्या 17 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतीचे शौर्यपत्र जाहीर झाले आहे.
तर एका पोलीस अधिकाऱ्याला गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी पदक घोषित झाले. देशभरातील पोलीस दलात तसेच सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानित केले जाते. या वर्षी सुद्धा राष्ट्रपतीनी देशभरात एकूण 208 पोलीस शौर्य पदक व 624 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर केले