दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. धुळीचे वादळ येउन पाऊस पडायला सुरुवात झाली. सकाळपासून उन्हाचे प्रचंड चटके लागत असतानाच पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या ३ ते ४ तासात सांगली, सातारा आणि धुळे या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत.
निसर्गामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे कधी उन्हं तर कधी पाऊस होत आहे. दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात सर्वत्र धुळीचे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावल्याचे बोलले जात आहे. अचानक अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली. सकाळपासून गर्मीचे चटके लागतं असतानाच पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहॆ पण नागरिकांची तारांबळ उडाली.
जोरदार वाऱ्यांमुळे शहरामध्ये रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने काही काळ दृश्यमानता कमी झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे धुळीचे लोट उठले होते. यानंतर शहरामध्ये अनेक भागात जोरदार पाऊस पडला. वादळ आणि पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. डहाणू, तलासरीत दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याचे पहायला मिळाले. पनवेलमध्येही वादळ, भरदुपारी अंधार झाला होता. तर दुसरीकडे पावसामुळे कळवा-मुंबई वीज वहिनी बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबईत येणाऱ्या ४०० मेगाव्हॉट विजेला फटका बसला आहे.