कोल्हापूर, प्रतिनिधी: नवीन शिक्षकांची कागदपत्राची पडताळणी सुरू आहे. ती पूर्ण होईल व जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर तत्काळ नियुक्ती करणार त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने आठवड्यात कार्यमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले. प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट) वतीने शिक्षकांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या दालनात चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांच्या संवर्गनिहाय याद्या तयार असून लवकरात लवकर बदली प्रक्रिया सुरू केली जाईल. चटोपाध्याय व वरिष्ठ श्रेणी प्रस्तावाबाबत हिंदी भाषा विषय सूट प्रस्ताव प्राप्त होताच त्वरित मंजुरी देण्यात येईल असे सीईओ यांनी सांगितले. यावेळी इतर प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर ,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील , सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँक संचालक बाळासाहेब निंबाळकर, बाळकृष्ण हळदकर , शिवाजी रोडे-पाटील, गजानन कांबळे, सुनील एडके, जिल्हा संघटक विलास चौगले, जिल्हा कोषाध्यक्ष विशाल प्रभावळे, प्रकाश सोहनी, रवी भोई, संभाजी पाटील, विश्वास पाटील, प्रभाकर गंगाधरे, रवींद्र केदार, विलास मुंडे आदी उपस्थित होते.