कागल प्रतिनिधी : कागलच्या मध्यवर्ती खर्डेकर चौकातील श्रीराम मंदीरमध्ये चालू वर्षी “चैत्र गुढी पाडवा” ते ” श्रीराम नवमी” या पर्व काळात भव्य दिव्य परमार्थीक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून “श्रीराम नवमी उत्त्सव 2024 ” भक्तिमय वातावारणात साजरा झाला.
आज प्रभू श्रीराम जयंतीदिनी श्रीराम मंदिर येथे दुपारी 12.00 वाजता विधिवत श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्सव पार पडला. महिलांनी सुरेल पाळणा गायन केले. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ.मधुरीमाराजे छत्रपती या उभयतांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी राजे प्रवीणसिंह घाटगे,शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, सौ नंदितादेवी घाटगे,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, खासदार संजय मंडलिक ,युवराज आर्यवीर घाटगे , राजपरिवाराची उपस्थिती होती . यावेळी उपस्थित हजारो श्रीराम भक्त भाविकांनी श्रीराम जय राम जय जय राम, जय श्री राम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यामुळे वातावरण श्रीराममय झाले.
या निमित्ताने श्रीराम जप, भजन, श्रीराम तांडव, व श्री हनुमान तांडव अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये श्रीराम सेवा महिला मंडळ, लक्ष्मी नरसिंह महिला मंडळ इचलकरंजी, सिद्धिविनायक महिला भजनी मंडळी इचलकरंजी, स्वरस्तोत्रम साधना ग्रुप कोल्हापूर यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित कांचनताई धनाले यांचे प्रवचनही झाले. दरम्यान आज दिवसभर श्रीराम नवमीच्या निमित्ताने दर्शनासाठी नागरिकांनी रीघ लावली होती. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. छायाचित्र कागल येथे श्री राम नवमी निमित्त महाआरती वेळी माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती त्यांच्या सुविध्य पत्नी श्रीमंत सौ मधुरिमाराजे छत्रपती , राजे प्रवीणसिंह घाटगे,शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,सौ नंदितादेवी घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, खासदार संजय मंडलिक ,युवराज आर्यवीर घाटगे