सूर्यनमस्कार 12 योगासनं मिळून बनला आहे. हे योगासन खूपच सोप्या पद्धतीने करता येऊ शकतात. शास्त्रांनुसार, सूर्य नमस्कार करण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात. चला तर मग पाहूयात सुर्य नमस्कार करण्याचे आरोग्यदायी फायदे…
उन्हात उभे राहून सूर्यनमस्कार घातले तर ‘ड’ जीवनसत्त्व शरीराला मिळते.सूर्यनमस्काराने चेह-यावर तेज येतं आणि चेहरा आणखी खुलतो. शरीर लवचिक होणे, चरबी कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणेदररोज सूर्यनमस्कार केल्यास संपूर्ण शरीराचे मसल्स मजबूत आणि लवचिक होतात.
छातीचे स्नायू बळकट होतात व श्वसन संस्थेसाठी उपयुक्त…पायाचे स्नायू बळकट होऊन पाठीचा कणा, मानेचे स्नायू लवचिक होतात.सूर्यनमस्कारामुळे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात रक्तात पोहोचतं.शरीराचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते.
स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यनमस्कार उपयोगी ठरतात.कंबर व पाठीचा कणा लवचिक होतो. स्नायू बळकट होतात व यकृतासारख्या पोटातील अवयवांसाठी उपयुक्त.पाठीचा कणा लवचिक होतो. स्नायू मजबूत होतात व कंबर लवचिक होते.
सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या वेळी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार घालावेत.