पुणे: कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर कमी झाल्याने अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी राज्य सरकार काहीही करत नाही. एरवी पालकमंत्री बदलण्यासाठी दहा वेळा दिल्लीला जाणारे कांद्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी दिल्लीला का जात नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी विरोधी आहे. राज्य सरकारचा कांदा पिकविणार्या नाशिक जिल्ह्यावर आणि शेतकऱ्यांवर एवढा रोष का?, हे कळण्यास मार्ग. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडे दहा महिन्यांपूर्वी कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळतील आणि ग्राहकाला देखील कांदा परवडेल, अशा पध्दतीने कांदा निर्यातीचे धोरण ठरविण्याची मागणी केली होती.