
कंदमुळांच्या भाज्यांचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कोणत्या आहेत या कंदमुळाच्या भाज्या ? चला तर मग जाणून घेऊयात.

मूळा: मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, मुळ्याचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. मुळ्यामध्ये सर्वाधिक फायबर्स आणि कमी कॅलरीज असतात. त्यामुळे, मुळ्याचे सेवन केल्याने आपले पोट भरलेले राहते आणि फार काळ भूक देखील लागत नाही. इतकेच नव्हे तर मुळ्याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळीत राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते.
बीट: बीटामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी खास करून बीटाचे सेवन केले जाते. यासोबतच शरीरातील रक्त वाढवण्यासाठी बीट फायेशीर आहे. त्यामुळे, अनेक जण त्यांच्या आहारात बीटाचा समावेश करतात. बीटामध्ये विविध पोषकघटकांसोबतच फायबर्सचे देखील भरपूर प्रमाण आढळते, शिवाय कॅलरीज कमी असतात. त्यामुळे, याचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
गाजर: बीटा कॅरोटिनयुक्त असलेले हे गाजर केवळ आपली दृष्टी सुधारत नाही, तर आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील गाजर फायदेशीर आहे. गाजराचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेक प्रकारे गाजराचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. गाजराचे सॅलेड, सूप किंवा गाजराच्या ज्यूसचे सेवन देखील केले जाते.