रात्रीच्या आहाराबाबत घ्यावयाची काळजी

रात्रीचा आहार लोक स्वत:च्या मनानेच ठरवतात. या सगळ्याचा आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. म्हणून रात्रीच्या जेवणाबाबत काही गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

बरेच जण रात्री हलका आहार घ्यायचा म्हणून रात्रीच्या वेळी फळं खातात. पण फळांमध्ये असणारे एन्झाईम्स कॉफीप्रमाणे काम करतात. फळं ही दिवसाच्या वेळात खायला हवीत. सकाळी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी फळं खाल्लेली केव्हाही जास्त चांगली. पण सूर्यास्तानंतर फळं खाणं योग्य नाही. फळांमुळे शरीरातील ग्लुकोज वाढण्याचीही शक्यता असते. रात्री झोपताना ग्लुकोज वाढणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी फळं खाणं योग्य नाही.

रात्रीच्या जेवणात सॅलेड हवे म्हणून अनेक जण सॅलेडचा समावेश करतात. पण ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या पचण्यासाठी बराच जास्त वेळ लागत असल्याने त्या रात्रीच्या वेळी खाणे टाळलेले केव्हाही जास्त चांगले.

काय खावे?

व्हेजिटेबल सूप

मिलेट खिचडी

डाळ खिचडी

पुलाव

वरण भात