बालिंगा : बालिंगा गगनबावडा पुढे कोकणात जोडणारा हा राज्य रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. याकरता या महामार्गाचे विस्तारीकरण गेल्या वर्षभरात रखडलेले आहे.
कासवाच्या मंद गतीने कामकाज सुरू आहे. त्यातच बालिंगे गावचे पुर्वदिशेला असलेल्या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम गेली वर्षभर रेंगाळत चालले आहे बालिंगा गगनबावडा ह्या रस्त्यावर वहातुक मोठ्याप्रमाणात सुरु आहे. या करीता पर्यायी कच्चा रस्ता तयार करणेत आला असून यावरती माती व मुरूम उखडून निघालेने दगडधोंडेच्या खाचखळग्यातुन गाडी चालवताना शरीराचा खुळ खुळा होत आहे तसेच रात्रीच्या वेळी या रस्त्यावर पाणी मारले जाते या मुळे कित्येकदा अपघात होवून अनेक लोक जायबंदी होत आहेत.
वहानधारकामधुन तिव्र संताप व्यक्त होत असुन दाद कोणाकडे मागायची हेच कळेनासे झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचे काम असल्याने अधिकारी काहीच उत्तर देत नाहीत असे अनेक वहानधारक सांगत आहेत. या सर्व वहानधारकांची एकच मागणी आहे की पुलाचे काम त्वरित करावे तो पर्यंत पर्यायी रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता व्यवस्थीत व सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.