महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर दर्शन उपक्रम

कोल्हापूर : महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कोल्हापूर शहर क्षेत्रातील ऐतिहासिकदृष्टया / सांस्कृतिकदृष्टया महत्वाची ठिकाणे दाखविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘कोल्हापूर दर्शन’ हा उपक्रम दि.7 फेब्रुवारी ते दि.5 एप्रिल 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात करण्यात आला.

यावेळी महानगरपालिकेच्या मुख्य चौकात सकाळीच महापालिकेचे भाऊसो महागांवकर शाळेचे विद्यार्थी घेऊन पहिली बस रवाना झाली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वहात होता. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले व उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी विद्यार्थ्यांना सदर उपक्रम प्रेरणादायी असून त्यांच्या ज्ञानात भर घालणारा आहे, महापालिकेच्याविद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिका शाळांमधून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सीएसआर मधून मुंबईच्या नामवंत उद्योगपती कडून निधी मागणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला असलेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी सांगितले.

यावेळी माजी महापौर आर के पोवार, उपआयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, नगरसचिव सुनील बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, महिला व बाल कल्याण समितीच्या प्रिती घाटोळे, प्राथमिक शिक्षण समिती कडील सहा. प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी, सुर्यकांत ढाले, संजय शिंदे, अजय गोसावी, शांताराम सुतार, राजाराम शिंदे, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

🤙 8080365706