
रोज सकाळी उठून ओल्या गवतावर किमान २० मिनिटे अनवाणी पायी चालायला हवं, असा आग्रह अनेक आरोग्य तज्ञ करतात. तर जाणून घ्या गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे.

जेव्हा आपण ओल्या गवतावर पाय ठेवून थोडा वेळ चालतो तेव्हा तो एक उत्तम पायाचा मसाज असतो. अशावेळी पायाच्या स्नायूंना भरपूर विश्रांती मिळते, ज्यामुळे सौम्य वेदना दूर होतात.
तुम्हाला कदाचित माहित नसेल की सकाळी गवतावर अनवाणी चालणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मनाला आराम मिळतो आणि तणाव दूर होतो.
