पंढरपूर : अजित पवार यांनी बारामती येथील मेळाव्यात केलेल्या विधानामुळे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. मात्र, त्यांच्या यांच्या विधानाचा विपर्यास करून आव्हाड हे अजित पवार यांना टार्गेट करीत आहेत.
त्यामुळे जितेंद्र आव्हाड याना विठ्ठलाने सद्बुद्धी द्यावी यासाठी पंढरपुरात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक केला. भाविकांना बदाम वाटप करीत ‘बा विठ्ठला. या जितेंद्र आव्हाड यांना लवकर चांगली बुद्धी दे’ असे साकडे घालत आंदोलन केले.