कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्या हस्ते व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट). शहर व ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यंदाचा प्रजासत्ताक दिन संयुक्तपणे साजरा केला. जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत शहराध्यक्ष आर.के. पोवार तर प्रस्ताविक सुनील देसाई यांनी केले. आभार निरंजन कदम यांनी मांनले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व आर.के. पोवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अश्विनीताई माने मांगुरकर, महादेव पाटील, अनिल घाटगे , रामराजे बदाले, गणेश जाधव, नितीनभाऊ पाटील, गणेश नलवडे ,जयकुमार शिंदे किसन कल्याणकर, श्रीकांत पाटील, प्रशांत पाटील, रियाज कागदी, सोहेल बागवान, लहू शिंदे, नागेश जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, अंजली पोळ, अरुणा पाटील, सलीम मुल्ला, मंगल कट्टी, सुवर्णा शिंदे, यांच्या बबन कांबळे, अविनाश माने, प्रशांत पाटील, रवी कांबळे, नागेश शिंदे, प्रकाश पांढरे, राजाराम मटकर, राजवर्धन यादव, सुनील सावर्डेकर, सदानंद कवडे, आनंदराव पोलादे, शशिकांत कदम,सायली महाडिक, छाया नलवडे, अनिता टिपुगडे, हर्ष साळुंखे, नितीन मस्के, मुसाभाई कुलकर्णी, दिनकर कांबळे, राजेंद्र ओंकार, यांच्यासह अन्य कार्यकर्ते यांच्यासह इतर पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.