सुभाष समुहाने सहकारातील आदर्श निर्माण करावा : संभाजीराजे

वडणगे प्रतिनिधी : दूध संस्था स्थापन करून अल्पावधीतच यश मिळविलेल्या सुभाष सहकार समुहाने पतसंस्थेची स्थापना करून सहकारात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने काम करत असलेल्या या समुहाने सहकारात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन माजी खासदर श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

वडणगे, ता. करवीर येथे सुभाष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य बी. एच. पाटील होते.
यावेळी संभाजीराजे यांच्या हस्ते ठेव पावती व शेअर्स पावतीचे वितरण करण्यात आले. बी. एच. पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात सुभाष सहकार समुहाचे संस्थापक चेअरमन सचिन चौगले यांनी संस्थांचे चालू काम आणि नियोजित कामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमास मार्केट कमिटीचे सभापती भारत पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, पार्श्वनाथ बँकेचे संचालक केवलसिंग रजपूत, आंबेवाडीचे माजी सरपंच एम. जी. पाटील, तुकाराम अष्टेकर, यशवंत नांगरे, सुनिल परीट, सरदार साळोखे, शिवाजी गायकवाड, संस्थेचे उपसभापती उत्तम साखळकर यांच्यासह सर्व संचालक, पंचक्रोशीतील मान्यवर, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सुभाष ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश उदाळे यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रविण चौगले यांनी केले.