कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. त्यामध्ये फक्त 34% मतदान झाले.काल रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. एकूण 17 जागांसाठी मतदान झाले. एकूण 28 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते.
आज झालेल्या मतमोजणीच्या निकालानंतर श्री राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मतमोजणी निवडणुकीचा निकाल कळताच मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे –
व्यक्तिसभासद प्रतिनिधी
१. सर्जेराव देसाई – १००२६
२. गणपती पाटील – ९९४४
३. आनंदा बनकर – ९९१३
४. अमरसिंह माने – १०१०१
५. अजित मोहिते – १००२५
६. दत्तात्रय राणे – ९९७३
७. दत्ताजीराव वारके – ९७३५
संस्था सभासद प्रतिनिधी
१. आप्पासो चौगले – १२८१
२. सुभाष जामदार – १२७९
३. प्रधान पाटील – १२६७
४. प्रवीणसिंह पाटील – १२७७
५. विजयसिंह पाटील – १२७७
६. जयकुमार मुनोळी – १२६६
७. बाबासाहेब शिंदे – १२७७
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी
१. परशुराम कांबळे – ११३८३
महिला राखीव प्रतिनिधी
१. अपर्णा पाटील – ११२१६
२. रोहिणी पाटील – ११०४८
बिनविरोध प्रतिनिधी
१.सुनील मोदी
२. राजसिंह शेळके