कात्यायनी दुध संस्था चेअरमनपदी शशिकांत खांडेकर तर व्हाईस चेअरमनपदी अनिल जांभळे यांची निवड..


बालिंगा (प्रतिनिधी ) बालिंगा ता. करवीर येथील श्री कात्यायनी सहकारी दुग्ध उत्पादक संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली.संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईसचेअरमन निवडी झाल्या असून यामध्ये शशिकांत खांडेकर यांची चेअरमन पदी व अनिल जांभळे यांची व्हाईसचेअरमनपदी निवड करण्यात आली.

यावेळी तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी काम पाहिले .नुतन संचालक केरबा जांभळे, शशिकांत चौगले, शशिकांत माळी, मोहन कांबळे, शंकर काटे,अनिता जत्राटे, रुपाली जांभळे,सरदार जांभळे, उत्तम पाटील, तसेच कर्मचारी संजय वागवेकर, कृष्णात पाटील, अशिष जत्राटे, त्याच बरोबर अनिल पोवार, श्रीकांत भवड, जनार्दन जांभळे,युवराज जत्राटे, बाजीराव ढेंगे, नंदकुमार जांभळे, मयुर जांभळे, गोविंद मोहिते, संभाजी जांभळे उपस्थित होते.