करवीर: कोपार्डे (ता.करवीर) येथील व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट व सकल हिंदू समाज यांच्या वतीने अयोध्या येथे साकारत असलेल्या राममंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे(सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले…
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे राममंदिर प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक सोहळा पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट व सकल हिंदू समाज यांच्या वतीने राममंदिर प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे यांनी तयार केलेला राममंदिराचा रथ हा महाराष्ट्रातील एक आगळा वेगळा उपक्रम ठरेल असे मत आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले…
तसेच या मंदिराची रथयात्रा कोल्हापूर शहर,करवीर,गगनबावडा व पन्हाळा या तालुक्यातून निघणार आहे या रथयात्रेचा उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले…
यावेळी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई,यशवंत सहकारी बँकेचे संचालक एकनाथ पाटील,कोपार्डे गावच्या सरपंच मेघा केशव पाटील,आसगांव सरपंच मानसिंग भोसले,पाडळी सरपंच तानाजी पालकर,मल्हारपेठ सरपंच शारदा दत्तात्रय पाटील,एकनाथ शिंदे,एस.के.पाटील,शिवाजी तोडकर,स्वप्निल शिंदे,मंदार परीतकर,बंकट थोडगे,सुरेश सुतार,युवराज बेलेकर,कैलास पाटील,अमर पाटील यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…