राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेचा कै.वसंतराव पंदारे सभागृह उद्घाटन तैलचित्र अनावरण सोहळा रविवारी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): शतकोत्तर वाटचाल करणारी राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव बँक लि. कोल्हापूर या बँकेच्या वतीने माजी अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक वसंतराव पंदारे यांच्या शंभराव्या जयंतीचे औचित्य साधून रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4 वाजता बँकेच्या प्रधान कार्यालयातील स्वातंत्र्य सैनिक कै. वसंतराव पंदारे सभागृह व तैलचित्र अनावरण उद्घाटन सोहळा शाहूपुरी 3 री गल्ली कोल्हापूर येथील प्रधान कार्यालयाच्या वास्तू समोर आयोजित करण्यात आला आहे.

हा समारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर विधान परिषदेचे सदस्य आ. अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मधुकर पाटील हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याला बँकेच्या सर्व माजी पदाधिकारी, सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.