हि तर लोकशाहीची हत्या – संजयबाबा घाटगेराहूल नार्वेकर यांचा केनवडे फाटा येथे निषेद

कागल (प्रतिनिधी) आमदार अपात्रतेबाबत कोणाच्या तरी दबावाला बळी पडून मनाला येईल तसा निकाल देवून विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या आणि न्यायाचाही खुन केला आहे असे सांगत नार्वेकर यांचा केनवडे फाटा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गाटाच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र शब्दात निषेद व्यक्त करण्यात आला.

शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली केनवडे फाटा ता.कागल येथे काळे झेंडे दाखवत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी श्री घाटगे यांनी बोलताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना जनतेच्या न्यायालयात शंभर टक्के न्याय मिळेल. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे सर्वांना सुरक्षा आहे पंरतू राजकिय वर्तुळात मात्र सुरक्षितता कोठेही शिल्लक राहिलेली नाही. नियम बाजूला ठेवून त्यांनी मनमानी केलेली आहे याचा मी तीव्र शब्दात जाहिर निषेद करतो योणा-या काळात आम्ही सर्वजन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी राहूल नार्वेकरच करायच काय खाली डोक वर पाय…नार्वेकरांचा धिक्कार असो अशा घोषणा देत घटना बाह्य निकाल दिल्याबद्दल काळे झेंडे दाखवून तीव्र निषेद करण्यात आला.

यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवगोंड पाटील,मारूती पुरीबुवा,दिग्वीजय पाटील,विकास पाटील, नानासो कांबळे, विश्वास पाटील, के.बी.वाडकर,दिलीप कडवे,साताप्पा तांबेकर, बाजीराव पाटील,अरूण पोवार, धोंडिराम एकशिंगे,उत्तम वाडकर,राजू जांभळे, सागर पाटील,राजू कुळवमोडे आदी कार्यकर्ते,शिवसैनिक उपस्थीत होते. 

निकाल म्हणजे, विना काळजाचं बकरं या निकाला बाबत राहूल नार्वेकरांवर सर्वसामान्य लोकांमधून सुद्धा अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत असे स्पष्ट करून संजयबाबा घाटगे म्हणले, एखादं जीवंत बकर कापायच आणि त्याला काळीजच नव्हतं असं म्हणायचं असाच हा प्रकार असल्याचे त्यांनी बोलून दाखवल