कोल्हापूर प्रतिनिधी: माघारीसाठी काही तास उरलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी मुंबईत बैठक घेऊन शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पॅनेल तयार केले आहे.या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेलची घोषणा ही केली. आता विरोधक विरोधी पॅनेल तयार करणार का? का सपशेल माघार घेणार..? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
या आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, वसंतराव मोहिते, गोकुळचे संचालक युवराज पाटील, प्रा. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, आजरा कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर आदी प्रमुख करणार आहेत.
राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्यावतीने शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील, प्रा. जयंत पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांनी आवाहन केले आहे की, शेतकरी संघ ही संस्था सध्या अत्यंत अडचणीतून वाटचाल करीत आहे. उर्वरित सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेऊन संघाच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही केली आहे.
आघाडीचे उमेदवार असे,
व्यक्ति सभासद गट:
१. ॲड. दत्तात्रय विश्वासराव राणे -राणेवाडी /कोल्हापूर
२. आनंदा गणपती बनकर -मुडशिंगी
३. दत्ताजीराव पिराजीराव वारके -कोल्हापूर
४. सर्जेराव पुंडलिक देसाई- म्हसवे
५. अजित जयवंतराव मोहिते- यळगुड
६. गणपती दत्तात्रय पाटील -पाडळी
७. अमरसिंह रणजीतसिंह माने- भादोले
संस्था सभासद गट:
१. जयकुमार बाळाप्पा मुनोळी -हलकर्णी
२. विजयसिंह युवराज पाटील -मौजे सांगाव
३. प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील- मुरगुड
४. प्रधान रंगराव पाटील- उत्रे
५. बाबासाहेब शंकरराव शिंदे-शिंदेवाडी
६. आप्पासो अण्णासो चौगुले- नरंदे
७. सुभाष विष्णू जामदार- नेरले
महिला प्रतिनिधी:
१. सौ. रोहिणी धनाजी पाटील- वडकशिवाले
२. सौ. अपर्णा अमित पाटील- वरणगे
इतर मागास प्रतिनिधी:
१. सुनील जबरचंद मोदी -कोल्हापूर
भटक्या विमुक्त जाती
१. रामसिंह भगवानराव शेळके- कोल्हापूर
अनुसूचित जाती- जमाती
१. परशुराव महादेव कांबळे- वाकरे
दरम्यान; यशवंत उर्फ राजू बापूसो पाटील रा. टाकवडे ता. शिरोळ व अशोक शंकरराव चौगुले रा. माजगाव ता. राधानगरी या दोघांना स्वीकृत संचालकपदाची संधी दिली जाणार असल्याचेही श्री. पाटील, प्रा. पाटील व श्री. खोत यांनी यावेळी स्पष्ट केले.