कोल्हापूर :- सभासदांकडून लाखाला चार हजाराची कर्जमुक्ती ठेव घेऊनही मृत्यूनंतर तात्काळ कर्जमाफी देऊन वारसांना लाभ देण्याऐवजी या ना त्या कारणांनी ही प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा नेमका हेतू काय?अनेक सभासदांना या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे तर काहींना उशिरा मिळाल्यामुळे पतपेढीची कर्जमाफी योजनाच मुळात संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचा आरोप कोजीमाशि पतसंस्थेचे चेअरमन बाळ उर्फ लक्ष्मण डेळेकर यांनी केला.
कोजीमाशि पतपेढीच्या निवडणुकीत स्वाभिमानी सहकार आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोल्हापूर येथील आर के वालावलकर प्रशालेत आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले सभासदांच्या मृत्यू नंतर त्यांच्या वारसांना कर्जमाफी योजना तात्काळ देणे आवश्यक असते.पण योग्य कागदपत्रे दाखल करूनही अनेक मयत सभासदांची कर्जे माफ झाली नाहीत.याचे गौडबंगाल काय?याचे उत्तर द्या असे सांगून दुःखद घटनेनंतर वारसांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी या सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या वारसांना कार्यलयांचे उंबरे झिजवायला लावले.याला सभासद हिट म्हणायचे काय? यामुळेच पतपेढी मध्ये परिवर्तन करून सभासदांना व त्यांच्या वारसांना सन्मान देण्याची संधी आम्हाला द्या असे त्यांनी आवाहन केले.
प्रगतीपथावर असणाऱ्या कोजमाशि पतसंस्था लाखाला दोन हजार कर्जमुक्ती ठेव घेते.योग्य कागदपत्रे दाखल झाल्यानंतर त्याच महिन्यात कोजीमाशि मध्ये कर्जमाफी योजनेचा लाभ वारसांना मिळवून दिला जातो.पण पतपेढीमधील प्रबुद्ध भारत हायस्कूल चे डी ए पाटील तसेच रत्नदीप हायस्कूल गंगानगरचे ए ए मिसाळ आदी सभासदांच्या वारसांना चार चार वर्षे कर्जमाफी योजनेचा फायदा मिळाला नाही.त्यामुळे पतपेढीची ही कर्जमाफी योजनाच मुळात संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी कैलास सुतार,निवास कामनकर,मदन निकम, राजेंद्र साळोखे,मुख्याध्यापिका साधना पोवार,शीतल हिरेमठ,मिलिंद सनदी आदी मान्यवर उपस्थित होते.
