कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एमडी प्रकाश जयसिंग चिटणीस यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून डॉ. नेजदार आणि त्यांच्या सहका-यांनी कट करून जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख चिटणीस यांनी फिर्यादीत केला आहे. संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बबलू विश्वास नेजदार, डॉ. संदीप विलास नेजदार, युवराज बाजीराव उलपे, निशिकांत किसन कांबळे, धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण विश्वास नेजदार, तुषार तुकाराम नेजदार, कौस्तुभ तुकाराम नेजदार, अजित विलास पवार, शिवाजी आंबी, अनंत श्रीहरी पाटील, श्रीप्रसाद संजय वराळे, प्रवीण बाबूराव वराळे (सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यासह अनोळखी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी डॉ. नेजदार यांच्यासह १३ जण आणि अनोळखी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला. राजाराम साखर कारखान्यात सात महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचा पराभव झाला होता. त्या पराभवाचा राग मनात धरून २० ते २५ जणांनी गाडी अडवून जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख फिर्यादी चिटणीस यांनी फिर्यादीत केला.
