न्यू दिल्ली येथील शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत श्रेयश गाठ व आदित्य ताटे विजेते

कोल्हापूर (प्रतिनिधी) 26 ते 29 डिसेंबर 2023 रोजी एन.सी.टी. न्यू दिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण(साई) संस्थेने दत्तक घेतलेल्या कोल्हापुरातील शासकीय कुस्ती केंद्र मोतीबाग तालमीतील मल्ल श्रेयश राहुल गाठ यास 86 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळाले तर आदित्य शिवाजी ताटे यास 51 किलो वजनी गटात कास्यपदक मिळाले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील व उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण तसेच जनरल सेक्रेटरी माजी महापौर ॲड.महादेवराव आडगुळे यांनी विजेत्या पैलवानांचे अभिनंदन केले.

कुस्तीच्या फ्री स्टाईल व ग्रिको-रोमन प्रकारातील अनुक्रमे रौप्य व कांस्य पदके मोतीबाग तालीम संघाच्या पैलवानांनी पटकावल्याने सध्या मोतीबाग तालीम संघात सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हे दोन्ही पैलवान वस्ताद सागर चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान व्यायाम शाळा राशिवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवरती कुस्तीचा सराव करत आहेत.

🤙 9921334545