बहिरेश्वर( प्रतिनिधी) : पंचवार्षिक निवडणूक २०२३ ते २०२८ सालाकरिता श्री. यशवंत सहकारी बॅकेसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली..संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल व श्री.राजर्षी शाहू संस्थापक पॅनेल व अपक्ष अशा ४८उमेदवारांसाठी आज निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.एकुण १८२०१ मतापैकी १२६२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला…
दोन्ही गटांकडून प्रचारात साम दाम दंड बळाचा वापर करण्यात आला.तर शेवटच्या दोन दिवसात मतदार राजाला खूष करण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार ही करण्यात आला… श्री राजर्षि शाहु संस्थापक पॅनेलसाठी अमर पाटील , गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील, पं स माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी दिग्गज नेते गटाचे नेतृत्व करत होते तर संस्थापक सत्तारूढ गटांसाठी माजी चेअरमन एकनाथ पाटील हे नेतृत्व करत होते.
दोन्ही गटांकडून विजय आपलाच असलेचा दावा करण्यात येत असला तरी मतदार राजाने आपल्या मतांचा कौल कोणाच्या पारड्यात टाकला आहे हे मात्र उद्याच्या निकालावरच अवलंबून आहे… संपूर्ण जिल्हयाला या निवडणुक निकालाची उत्सुकता लागली आहे..
